
सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कामाची दखल घेऊन बांदा नवरात्र उत्सव मंडळाकडून प्रतिष्ठानचा सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांना गौरविण्यात आले. आषाढ महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला. सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे, सचिव समीरा खलील, रवी जाधव, रूपा मुद्राळे, सुजय सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजय नाईक, शिक्षण सभापती तथा रोटरी अध्यक्ष प्रमोदभाई कामत, ग्रामपंचायत सभासद व मंडळाचे आधारस्तंभ विनायक भाई दळवी, उपाध्यक्ष प्रवीण शिरसाट, भाऊ वळंजु, माजी अध्यक्ष शशी पित्रे सल्लागार, श्वेता कोरगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजप महिला जिल्हाध्यक्ष, भालचंद्र केळुस्कर, बुवा तुकाराम गावडे, ज्येष्ठ दशावतार आनंद गवस उद्योजक, अपेक्षा नाईक सरपंच मंडळाचे कार्यकर्ते समीर सातार्डेकर, भाई वाळके, साई काणेकर आदी उपस्थित होते.