
वेंगुर्ला : रेडी ग्रामपंचायत निवडणुकीत रामसिंग राणे यांनी तब्बल १ हजार ४५४ अशी विक्रमी मते मिळवत विजय मिळवला. रामसिंग राणे यांच्या विरोधात एकूण ९ उमेदवार हे सरपंच पदासाठी रिंगणात होते. असे असतानासुद्धा ग्रामस्थांनी रामसिंग राणे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना विक्रमी मते दिली. गेल्या ५ वर्षात रेडी गावात केलेली कामे व जनतेशी ठेवलेला आपुलकीचा संपर्क यामुळेच मला रेडी गावात विक्रमी मते मिळाली. हा ग्रामस्थांनी ठेवलेला विश्वास पुढील ५ वर्षात सार्थकी लावणार असल्याचे मत यावेळी रामसिंग राणे व्यक्त केले.