
वेंगुर्ले : प्रसिद्ध व जागृत तीर्थक्षेत्र देवस्थान रेडी येथील श्री गजानन देवस्थान द्वितीय कलशारोहण वर्धापन उत्सवास सकाळी श्री गणेश मूर्तीवर अभिषेक करून सुरुवात करण्यात आली आहे. तसेच मंदिरात गणेश अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तने विधीला ब्राम्हणांच्या उपस्थितीत सुरुवात झाली असून थोड्याच वेळात महाआरती व तिर्थप्रासादला सुरुवात होणार आहे.
तसेच दुपारी १ वाजता महाप्रसादला सुवरूवात होणार आहे. या वर्धापन उत्सवानिमित्त भाविकांनी सकाळपासून श्री गणेशाच्या दर्शनाला उपस्थिती दर्शवली आहे.