उबाठा सेनेच्या रेडी जि.प. मतदार संघ विभाग प्रमुखपदी नामदेव राणे

Edited by: दिपेश परब
Published on: January 13, 2024 05:48 AM
views 237  views

वेंगुर्ला : शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रेडी जिल्हा परिषद मतदार संघ विभाग प्रमुख पदी नामदेव शिवाजी राणे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उपविभाग प्रमुख पदी संदिप गावडे, शिरोडा शाखा प्रमुख पदी राकेश परब व महिला उपतालुकाप्रमुखपदी समृद्धी कुडव यांची निवड करण्यात आली. 

   याबाबतचे नियुक्तीपत्र नियुक्तीपत्र जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख बाळू परब, उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, युवा सेना तालुका प्रमुख पंकज शिरसाठ, युवती सेना तालुका प्रमुख वैशाली वडर, शहर प्रमुख अजित राऊळ, महिला विभाग संघटिका रश्मी डिचोलकर, उपतालुका संघटिका समृद्धी कुडव, सायली पोखरणकर, सावंतवाडी उपतालुकाप्रमुख आबा सावंत, उपतालुका संघटक संतोष मांजरेकर, माजी सरपंच अनंत कांबळी, माजी उपसरपंच राजन राणे राजेंद्र कांबळी, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत राऊळ, माजी उपसरपंच सायली पोखरणकर, माजी ग्रामपंचायत सदस्य वंदना कांबळी, नंदकुमार मांजरेकर,  रिचर्ड लोबो, लक्ष्मीकांत राणे तसेच शिवसैनिक उपस्थित होते.