सावंतवाडी अर्बनला RBI चे निर्देश !

Edited by: विनायक गावस
Published on: June 16, 2023 11:41 AM
views 165  views

सावंतवाडी : बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, 1949 च्या कलम 35 अ मधील पोटकलम (1) अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करत बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट च्या कलम 56 सह रिझर्व्ह बँकेने 13 जून 2023 रोजी सावंतवाडी अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक लि., सावंतवाडी यांना काही निर्देश जारी केले आहेत.

14 जून 2023 रोजीचा व्यवसाय बंद झाल्यापासून बॅंक आरबीआयच्या लेखी मंजूरीशिवाय किंवा कोणत्याही कर्जाचे आणि अग्रिमांचे नूतनीकरण, कोणतीही गुंतवणूक, निधीची उधार घेणे आणि नवीन ठेवी स्वीकारणे यासह कोणतेही दायित्व स्वीकारणार नाही, वितरित करू शकणार नाही किंवा कोणतेही वितरण करण्यास सहमती देणार नाही. 13 जून 2023 रोजी आरबीआय निर्देशांनुसार अधिसूचित केल्याशिवाय कोणतीही तडजोड किंवा व्यवस्थेत प्रवेश करणे आणि कोणत्याही मालमत्तेची विक्री, हस्तांतरण किंवा अन्यथा विल्हेवाट लावणे. बँकेच्या संकेतस्थळावर/परिसरात लोकांच्या स्वारस्य सदस्यांच्या अवलोकनासाठी प्रदर्शित केले जाते. बँकेची सध्याची तरलता स्थिती लक्षात घेता सर्व बचत बँक किंवा चालू खात्यांतील किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेतून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. परंतु त्यात नमूद केलेल्या अटींच्या अधीन ठेवींवर कर्ज सेट करण्याची परवानगी आहे. 


पात्र ठेवीदारांना त्याच्या/तिच्या ठेवींची 5,00,000/- (रुपये फक्त पाच लाख) च्या आर्थिक मर्यादिपर्यंत ठेव विमा दाव्याची रक्कम त्याच क्षमतेने आणि त्याच अधिकारात, ठेवीतून मिळण्यास पात्र असेल विमा आणि पत हमी कॉर्पोरेशन, DICGC कायदा (सुधारणा) 2021 च्या कलम 18A च्या तरतुदींनुसार, संबंधित ठेवीदारांच्या इच्छेच्या सबमिशनवर आधारित. ठेवीदार अधिक माहितीसाठी त्यांच्या बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. तपशील DICGC वेबसाइटवर देखील प्रवेश केला जाऊ शकतो. www.dicgc.org.in. आरबीआयच्या वरील निर्देशांचा मुद्दा म्हणजे आरबीआयने बँकिंग परवाना रद्द केला असे समजू नये. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल. रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार या निर्देशांमध्ये बदल करण्याचा विचार करू शकते. हे निर्देश 14 जून 2023 रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहतील आणि पुनरावलोकनाच्या अधीन असतील अशी माहिती आरबीयाचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाळ यांनी प्रेस रिलिजच्या माध्यमातून दिली आहे.


अर्बन बँकेच्या आर्थिक सुधारणेसाठी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना

 रिझर्व्ह बँक नुकतेच बँकिंग रेगुलेशन अॅक्ट १९४९ मधील कलम ३५ ए अंतर्गत आमच्या बँकस सूचना दिले आहेत. या सूचना या बॅक कामकाज सुधारणा करणीसाठी आणि ठेविदारांचे हित जपण्यासाठी दिलेल्या आहेत.  सूचना या ठराविक कालावधीसाठी असून त्यामुळे बँकेच्या अस्तित्वावर कोणताही परिणाम होणार नाही. बँकेने गेली कित्येक वर्षे रिझव्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून कारभार केलेला असून नेहमी ग्राहकाभिमुख व ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक पावले उचललेली आहेत. इतर बँकांना भेडसावणारा एन पी ए चा प्रश्न आमच्या बँकेस नाही. बँकेने कर्ज वसुली नियमितपणे करून सातत्याने गेली दहा वर्षे नक्त एन पी ए चे प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश मिळविलेले आहे. बँकेचे संचालक मंडळ हे गेली कित्येक वर्ष निस्वार्थीपणे कोणतेही लाभ न घेता बैंक हिताचे निर्णय घेत आहे. त्यामुळेच बँकेने गेली तीन वर्षे सतत नफा कमविलेला आहे. बँकेच्या ठेव व कर्ज व्यवहारामध्ये सातत्याने वृद्धी झालेली आहे. बँकेने ठेव विमा DICGC RBI यांचेकडे नियमित भरून बँकेच्या ठेविदारांच्या ठेवी सुरक्षित केलेल्या आहेत. बँकेमध्ये कधीही, कोणताही अपहार, गैरव्यवहार, घोटाळे झालेले नाहीत. सदर बाब हि बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या पारदर्शी कारभाराचे द्योतक आहे. बँकने अजून पर्यंत कोणत्याही इतर बँकेकडून कर्जे घेतलेली नाहीत म्हणजेच बँक हि स्वयंपूर्ण असून सर्व ठेवीदारांचे रक्कम देणेस सक्षम आहे. बँकेच्या एकूण ठेवी रु.३३.५१ कोटी असून बँकेची एकूण गुंतवणूक रु.११.६५ कोटी आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली शाखाच्या जागा स्वमालकीच्या आहेत. बँकेच्या कर्मचारी वर्गनिही गेली कित्येक वर्षे वेतनवाढ घेतलेली नाही व प्रसंगी आपल्या पगाराचे योगदान बँकेसाठी दिलेले आहे. दरवर्षी होणा-या बँकेच्या शासकीय, रिझर्व्ह बँक तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारचे घोटाळे, अनियमितता आढळलेली नाही. आपल्या सावंतवाडी शहराचे आमदार दिपक केसरकर यांनी आपल्या माध्यमातून यापूर्वी रु ५ कोटी पर्यंतचे भाग भांडवल बँकेस देऊन बँकेला स्थैर्य देण्यास अभूतपूर्व योगदान दिलेले आहे. अजूनही त्यांच्या माध्यमातून व त्यांचे मार्गदर्शनाखाली, बँकेला भाग भांडवल मिळणार असून बँकेला अजून सक्षमता येणार आहे. म्हणजेच बँक आर्थिक दृष्ट्या सक्षम असून सर्व ठेवीदारांचे पैसे बँकेकडे सुरक्षित आहेत त्यामुळे बँकेचे सर्व ग्राहक ठेवीदार, हितचिंतक यांनी बँकेवरील विश्वास यापुढेही कायम ठेवावा व बँकेला सहकार्य करावे असे जाहीर आवाहन बँकेच्या संचालक मंडळातर्फे करण्यात येत आहे अशी माहिती अर्बन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे.


... म्हणून बँकेवर ही वेळ : अँड. नकुल पार्सेकर


दरम्यान, याबाबत सामाजिक कार्यकर्ते अँड. नकूल पार्सेकर म्हणाले, अर्बन बँकेच्या आर्थिक अनियमितीते संदर्भात गेली दहा वर्षे सजग ठेवीदार म्हणून आवाज उठवला होता. दक्षिण कोकणातील जुनी बँक स्व. वामनराव कामत, मधूसुदन पोकळे अशा लोकांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पारदर्शी व्यवहार बँकेत केले होते. त्या काळात या बँकेमुळे छोड्या मोठ्या व्यापारी वर्गाला साथ मिळत होती. अशा नावाजलेल्या बँकेत गेल्या १० वर्षात आर्थिक अनियमितता असल्यानं वेळोवेळी विरोध केला होता. निवडणूक देखील पूर्ण पॅनल विरूद्ध लढवली होती. ८ कोटी बँक तोट्यात आहे असं जाहीर पत्रक देखील काढल होत. याचा उद्देश हा एकच ह़ोता, लोकांच्या कष्टातून घामाच्या पैशातून उभी राहिलेली बँक या बँकेवर अशी परिस्थिती येऊ नये असा उद्देश होता. परंतु, सत्ताधाऱ्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. याचे प्रमुख विद्यमान शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या ल़ोकांना पाठिशी घातल्याने हे दिवस पहावे लागेल‌ अशी प्रतिक्रिया दिली.