रवींद्र चव्हाण - निलेश राणेंची धोंडी चिंदरकर यांनी घेतली भेट

Edited by:
Published on: November 27, 2024 18:54 PM
views 404  views

मालवण : विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी मुंबईत भेट घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील विकासाची दारे खुली करताना येथे रोजगार उपलब्ध करताना आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष दिले जाईल असा शब्द दोन्ही नेत्यांनी दिला अशी माहिती चिंदरकर यांनी दिली. यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, भाजपा शहर प्रभारी संतोष गावकर आदी उपस्थित होते.