सटेलमेंटचे दरवाजे रविंद्र चव्हाणांनी बंद केल्याने उपरकरांची चिडचिड : धोंडी चिंदरकर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 15, 2023 18:47 PM
views 87  views

मालवण : ज्यांची आंदोलनेच सटेलमेंटची असतात त्यांनी कार्यतत्पर पालकमंत्र्यांवर बोलणे हे सूर्यावर थूकण्यासारखे आहे. उपरकरांनी या जिल्ह्यातील एक कामं सांगावं जे आपणं केलं. फक्त टीका करणे आणि सटेलमेंट झाली की गप्प बसणे हेच काम या कंपूचे असल्याची टीका भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केली आहे. 


मुंबई गोवा महामार्गाचे एक लेन पुर्ण झाली याचं फार दुःख मनसेला जास्त आहे. कारण विना सेटलमेंट सगळ चालू राहील. काही गोष्टी राहिल्या असतिल पण पालकमंत्री चव्हाण यांनी अतिशय तळमळीने झोकून देऊन या जिल्ह्याच्या विकासासाठी वेळ देऊन चांगल काम करत आहेत. याची जान सिंधुदुर्ग वासियांना पर्यायाने कोकणी जनतेला आहे. तेव्हा उपरकरांनी आपली आणि आपल्या पक्षाची काळजी घ्यावी आणि नेहमी उलटे पाढे वाचण्यापेक्षा थोडे सकारात्मक बोलण्याचे कामं करावे. कही गोष्टी राहिल्या असतील पण ते पूर्णत्वाकडे नेण्याचे काम सुरू आहे आणि ते नक्की होईल असेही चिंदरकर म्हणाले.