रविकिरण तोरसकर यांची भाजपा मच्छीमार सेल जिल्हा संयोजक पदी नियुक्ती

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 13, 2023 16:51 PM
views 57  views

मालवण : मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर यांची भाजपा मच्छीमार सेल सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी नियुक्ती झाली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.

सिंधुदुर्गातील तीन सागरी तालुके, त्याचबरोबर जिल्ह्यातील खाडी व नदी क्षेत्रातील मच्छीमार आणि मत्स्यव्यवसायीक यांच्यासाठी भाजपा मच्छीमार सेल कार्यरत आहे.

मत्स्य व्यवसायाला परप्रांतीय अनधिकृत मासेमारी, डिझेल कोटा, एनसीडीसी थकित कर्जे, सुसज्ज् बंदरे नसणे, सरकारी योजना मधील त्रुटी, अपुऱ्या नागरी सोयी सुविधा अशा अनेक विविध समस्या भेडसावत आहेत. भाजपा मच्छीमार सेलच्या माध्यमातून सदर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्ह्यात नव्याने उभारी घेणाऱ्या मत्स्यपालन क्षेत्राला उभारी देण्यासाठी विशेष प्रयत्न पालकमंत्री आणि स्वतः मस्त्य शेतकरी असलेले रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे. मत्स्य व्यवसाय वर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र अंमलबजणी कक्ष स्थापन  करणे आणि पंतप्रधान मत्स्य संपदा योजना अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थी यांना लाभ मिळवुन देणे, मच्छीमार महिला सक्षमीकरण ही प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन कार्यरत राहणार आहे. त्याचबरोबर मच्छीमार पट्ट्यामध्ये भाजपा संघटना वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे रविकिरण तोरसकर यांनी सांगितले.