मळगाव येथील रवळनाथ मंदिरात जागर उत्सव सुरु

रवळनाथ देवाच्या जत्रोत्सवाने होणार सांगता
Edited by: विनायक गावस
Published on: November 22, 2023 15:44 PM
views 140  views

सावंतवाडी : मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरातील जागर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे या जागर उत्सव कालावधीत मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत रवळनाथ देवाच्या जत्रोत्सवाने या जागराची सांगता होणार आहे.

      

मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुराची पौर्णिमा या कालावधीत जागर उत्सव होत असतो. महिनाभर सुरु असलेल्या या जागर कालावधीत दर दिवशी मंदिरात पुराणवाचन व मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा काढली जाते. पालखीनंतर देवाची आरती व गाऱ्हाणे झाल्यावर उपस्थित सर्वांना प्रसाद वाटप केला जातो  त्रिपुरारी पौर्णिमेला रवळनाथ देवाच्या वार्षिक जत्रोत्सवाने या जागराची सांगता केली जाते. यंदा रवळनाथ देवाच्या जत्रोत्सव २६ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे या जत्रोत्सवानंतर गावातील जत्रोत्सवास प्रारंभ होते रोज मानकरी व ग्रामस्थ उपस्थिती दर्शवत जागराचा व पुराणवाचनाचा लाभ घेत आहेत.