
कणकवली : रविवारी २६ नोव्हेंबर रोजी होणा-या वार्षिक जत्रोत्सव निम्मित कणकवली नगरपंचायतीच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.
यामध्ये प्रामुख्याने रस्ता साफसफाई, संपुर्ण परिसरात ग्रास कंटीग करण्यात आलेली आहे. मंदिर परिसर स्वच्छता, पार्किंग व्यवस्था, ठिकठिकाणी विद्युत व्यवस्था, येणा-या भाविकांची वाहतुक कॉडी होऊ नये म्हणून विशेष एक दिशा पर्यायी मार्गाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. यामध्ये दुचाकी आणि चार चाकी वाहने बाहेर जाण्यासाठी स्वयंभू मंदिराकडून बबन राणे यांच्या घराजवळून सुतारवाडी मध्ये बाहेर जाण्यासाठी तात्पुरता रस्ता केला आहे.त्यामुळे यावर्षी वाहतूक कोंडी सुटणार आहे.
या मार्गावर दिशादर्शक फलकाची व्यवस्था, पार्किंग फलकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच, यात्रेसाठी येणा-या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची दक्षता नगरपंचायतीकडून घेण्यात येत आहे.