२९ ते ३१ जानेवारीला राऊळ महाराजांचा ३९ वा पुण्यतिथी महोत्सव

Edited by: संदीप देसाई
Published on: January 27, 2024 13:12 PM
views 149  views

कुडाळ : श्री प. पू. सद्गुरू समर्थ श्री राऊळ महाराज यांचा ३९ वा पुण्यतिथी महोत्सव २९ ते ३१ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे. त्या निमित्त तीन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक उपक्रमांच आयोजन करण्यात आल आहे. मंगळवारी ३० जानेवारी रोजी अपंगाना जयपूर फुटचे मोजमाप शिबीर, तर  ३१ जानेवारी या मुख्य दिवशी ट्रस्टच्या नवीन नावाचे सद्गुरू राऊळ महाराज संस्थान, पिंगुळी श्री क्षेत्र पिंगुळी नावाने नामकरण विधी संपन्न होणार आहे.

पुण्यतिथी महोत्सव निमित्त तीन दिवसात  पुढील कार्यक्रम होणार आहेत. यात सोमवार २९ जानेवारीला  पहाटे ५.३० नित्य काकड आरती,  सकाळी ७.०० सौर प्रायश्चित्त, देवतावंदना संकल्प, गणेश पूजा, स्वस्ति पुण्यहवचन, मातृका पूजन, नंदी श्राद्ध, आचार्य वरण, मधुपर्क आचार्य कर्म, स्थळ शुद्धी, देवस्थापना, पथ वचन, कुंकुमारजन पूजा इ. १२.३० महाराजांची महाआरती , दुपारी

दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३.०० विविध सांस्कृतिक कार्यक्रम,  संध्याकाळ. ६.३० नित्य सांज आरती,  संध्याकाळ. 7.30 ते 8.30 'हवा नवा तो सूर' भक्ती संगीत कार्यक्रम सादरकर्ते श्री. सुनिल पाडगावकर (मळगाव), रात्री ९.०० ह. भ. प. मुंडले यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. 

३० जानेवारीला  दुपारी १२.३०वा.श्री.ची महाआरती,दु.१.ते ३.०० महाप्रसाद ,दुपारी १.०० ते ६.०० वाजता सप्तसूर गायन कार्यक्रम झाराप , नामस्मरण नामदेव महाराज भक्तमंडळ,तसेच श्री.प.पू.राऊळ महाराज  सप्तसूर महिला भजन मंडळ यांचे सुश्राव्य भजन संपन्न होईल. सांय.६.०० श्री.ची महाआरती, , त्यानंतर श्री. नागेश पाटील बुवा राधानगरी, कोल्हापूर यांची संगीत मैफल स्वामिगंध, रात्री ९.०० वाजता ह. भ. प. श्री. कैलास खरे, पुणे यांची सृश्राव्य कीर्तन .

बुधवारी  ३१  जानेवारीला (मुख्यदिवस) नित्यकाकड आरती ,समाधीस्थानी सार्वजनिक अभिषेक व गाऱ्याणे ,शतचंडी याग ,सकाळी १०.०० वाजता मोफत मधुमेह तपासणी तसेच हाडांची तपासणी सौजन्य (Mankind Pharma Ltd) व श्री.अण्णा महाराज Chartable Trust यांच्या संयुक्त विद्यमानाने. तसेच दामोदर बोग्देश्वर गोवा यांची दिंडी क्र.६०२ या पथकाचे आगमन,प.पू,अण्णा महाराज समाधी मंदिरात पादुका पुजन ,दु.१२.वाजता भक्त भाविकांच्या उपस्थितीत सद्गुरू राऊळ महाराज संस्थान नामकरण सोहळा, दुपारी १२.३० वा.श्री.ची महाआरती ,दु.१.ते रात्रो ११  अखंड महाप्रसाद,दुपारी १.३०वाजता आजरा दिंडी पंचक्रोशीचे आगमन त्यानंतर ,दु.१ते३ वाजता दामोदर बोग्देश्वर गोवा  यांच्या आकर्षक दिंडीचे वारकरी भजन त्यानंतर दत्तभजनी मंडळ बच्चेसावर्डे कोल्हापूर यांचे सुश्राव्य भजन त्यानंतर राऊळ महाराज भक्त मंडळ आजरा यांचे सुश्राव्य भजन ,त्यानंतर प.पु.राऊळ महराज भक्त मंडळ मुंबई यांचे सुश्राव्य भजन ,सायंकाळी ६.३० वाजता श्री.ची सांजआरती,आई माऊली ढोलपथकच्या गजरात पालखी मिरवणूक सोहळा राऊळ महाराज समाधीस्थान ते जन्मस्थान पर्येंत ,श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी भजन मंडळ शिरोडा ,श्री देवी पावणाई लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ कुसगाव  वारकरी भजन ,रात्री १०.वाजता श्री. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचे वेंकटेश पद्मावती हे ट्रिक्ससीन युक्त नाटक संपन्न होणार आहे. श्री. प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त श्री क्षेत्र पिंगुळी येथे आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुद्धा करण्यात येणार आहे. 

तरी सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक सोहळ्याचा व अखंड महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन कार्याध्यक्ष विठोबा विनायक राऊळ, पदाधिकारी व विश्वस्त मंडळ आणि भक्त परिवार सद्गुरू राऊळ महाराज संस्थान श्री क्षेत्र पिंगुळी यांच्या वतीने करण्यात येत आहे.