रत्नागिरी - सिंधुदुर्गचा पुढचा खासदार विनायक राऊतच : शैलेश परब

Edited by: विनायक गावस
Published on: July 11, 2023 17:31 PM
views 135  views

सावंतवाडी : कोणी कितीही फुशारक्या मारुदेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार हे विनायक राऊतच असणार,  यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी आत्तापासूनच तयारीला लागा असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी केले. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस भगवा सप्ताह म्हणून आपापल्या गावागावात साजरा करा. या माध्यमातून मुख्यमंत्री पदाच्या काळात कामे जनतेपर्यंत पोहोचवा याकरता शाखाप्रमुख विभाग प्रमुख यांनी गाव पातळीवर नियोजन आकार असे आवाहनही श्री परब यांनी यावेळी केले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये शैलेश परब यांच्या माध्यमातून छत्र्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सावंतवाडी तालुक्यातील छत्र्या वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

परब पुढे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे यांनी विकासात्मक कामे केली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ शासकीय मेडिकल कॉलेज अन्य महत्वाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले कोरोना काळात त्यांनी केलेले काम गावात पोहोचवा आज मंत्रिपदासाठी लाचार होऊन मिंधे गटात गेलेले दीपक केसरकर उद्धव ठाकरे वर टीका करत आहेत. परंतु हेच कोरोना काळात पाय दुखी चे कारण पुढे करून मुंबईतील घरात लपून बसले होते त्यामुळे त्यांचा खरा चेहरा खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस भगवा सप्ताह म्हणून साजरा झाला पाहिजे यासाठी शाखाप्रमुख विभागप्रमुख यांनी गावागावांमध्ये मेहनत घ्या. दुसरीकडे आज काहीजण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीबाबत फुशारक्या मारत आहेत कोणी कितीही फुशारक्या मारू देत या मतदारसंघाचा खासदार विनायकरावतच असणार फक्त शिवसैनिकांना थोडी मेहनत घ्यावी लागणार यासाठी आतापासूनच प्रत्येकाने कामाला लागावे महागाई जीएसटी बाबत जनतेमध्ये जाऊन आवाज उठवला पाहिजे आज महागाईने जनता भरपूर निघाली आहे सिलेंडरचे गॅस दुपटीने वाढले आहेत जनतेला पटवून दिले पाहिजे.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संजय पडते गितेश राऊत चंद्रकांत कासार तालुकाप्रमुख रुपेश राऊळ चंद्रकांत उर्फ बाळा गावडे गुणाजी गावडे सागर नानोसकर भारती कासार  सौ साठेलकर शब्बीर मणियार आधी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते , बाळा गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत येणारा काळ हा पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच असणार त्यामुळे कोणीही डगमगून न जाता संघर्षाने पेटून उठा असे सांगितले.यावेळी शैलेश परब यांच्या वतीने उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गावागावातील पदाधिकाऱ्यांकडे छत्र्या वाटप करण्यात आल्या.