
मंडणगड : मंडणगड उमेद अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील महिला रोजगार स्वंयरोजगार व व्यवसाय क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मंडणगड महाराष्ट्र शासन उमेद अभियान महिलांसाठी त्यांच्या शाश्वत रोजगाराचा व आर्थिक उन्नतीचा व अन्य क्षेत्रातील प्रगतीचे एक मोठे माध्यम झाले आहे.
४ ऑगस्ट २०२५ रोजी तालुक्यातील कुडुक खुर्द गावातील महिलांनी उमेद अभियानाच्या माध्यमातुन परस्पर सहकार्याने सुरू केलेल्या पत्रावळी कारखान्याचे उद्घाटन तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशक अमित सरमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोबत प्रभाग संघ व्यवस्थापक शुभ्रा कदम व समूहाच्या सर्व महिला उपस्थित होत्या.