धनंजय कुलकर्णी वरिष्ठ श्रेणी पोलीस अधिक्षक

Edited by: ब्युरो
Published on: July 04, 2024 13:36 PM
views 34  views

रत्नागिरी : जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांची वरिष्ठ पोलीस अधिक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक म्हणूनच ते पुढे कार्यरत राहाणार आहेत. त्यामुळे त्यांचे जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे. धनंजय कुलकर्णी यांची ऑक्टोबर २०२२ रोजी रत्नागिरी पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसह बारसू येथील रिफायनरीचा प्रश्नांसह जिल्ह्याच्या सुरक्षा आणि सामाजिक सलोखा याकडे त्यांनी विशेष लक्ष देऊन काम केल्याने अनेक गुन्ह्याची सहज उकल झाली आहे. बुधवारी संध्याकाळी श्री. कुलकर्णी यांच्या पदोन्नतीची बातमी रत्नागिरीत येताच सर्वानी त्यांचे अभिनंदन केले.