
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांनी दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी १३ वर्षा खालील वयोगटातील मुलींसाठी व मुलांसाठी फुटबॉल निवड चाचणीचे आयोजन केले आहे. ही निवड चाचणी सेंट थॉमस हायस्कूल कारवांची वाडी, रत्नागिरी येथे सकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील फुटबॉल खेळणाऱ्या १३ वर्षा खालील मुलींनी व मुलांनी या Selection Trails साठी उपस्थित रहायचं आहे. निवडण्यात आलेला १३ वर्षा खालील मुलींचा व मुलांचा फुटबॉल संघ येत्या काळात दरम्यान वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित १3 वर्षांखालील मुली व मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहे.
विशेष टीप - खेळाडूचा जन्म २०१२ व २०१३ साली झालेला असणे बंधनकारक आहे. येताना सोबत ओरिजनल आधार कार्ड, जन्म दाखला ( Birth Certificate) ओरिजनल आणि फोटो घेऊन यावे. अधिक माहिती साठी प्रसाद परांजपे ९९२०६७४३०६ , नित्येय वाघदरे -9096459333, देवेंद्र साळवी - 727618 5999, विनोद म्हस्के ९४२२४४२६२२ यांच्याशी संपर्क साधावा.