
चिपळूण : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध पदांच्या भरतीसाठी आज जिल्ह्यात .माने इंजिनिअरिंग कॉलेज, आंबव देवरुख, विप्रो खेर्डी चिपळूण, ज्ञानदीप- मोरवंडे, खेड आणि घरडा इन्स्टिटय़ूट लवेल , खेड या चार परिक्षा केंद्रांवर, ऑनलाईन पद्धतीने आज रविवार, ता.२ सप्टेंबर रोजी ३ सत्रांत आयोजित केली होती. या परीक्षेसाठी प्रत्येेक पदासाठी , प्रती विद्यार्थी रुपये एक हजार परिक्षा शुल्क आकारण्यात आले आहेत. या परीक्षेचे अर्ज भरणे , अर्ज स्वीकारणे , परीक्षेची सर्व माहिती बँकेच्या वेबसाईट द्वारे ऑनलाईन राबविण्यात आली आहे.
मात्र चार परिक्षा केंद्रांपैकी खेड तालुक्यातील लवेल येथील, घरडा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या केंद्रावर इंटरनेट सुविधा कोलमडल्याने या ऑनलाईन परिक्षेत अडथळा निर्माण झाल्याने या केंद्रावरील प्रत्येकी २७० प परिक्षार्थींच्या प्रतीदिन ३ बॅच प्रमाणे ८१० परीक्षार्थीना ही परिक्षा देता आली नाही. यामुळे परिक्षा केंद्रावर परीक्षार्थी आणि पालक यांचा गोंधळ उडाला. यामुळे उद्या, सोमवार ३ सप्टेंबर रोजी होणारी परीक्षाही रद्द करण्यात आली असल्याने उद्याचे सुमारे ८०० विद्यार्थी असे एकूण १६०० विद्यार्थ्यांना मनस्ताप झालेला आहे. आज लवेेल येथे परिक्षेला जिल्ह्यातील लांजा, देवरुख, रत्नागिरी, मंडणगड, दापोली, खेड यासह ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी सकाळपासून ताटकळत उभे होते. मात्र अचानक इंटरनेटचा अडचणीमुळे त्यांना परीक्षा देता आली नाही. मुलांना आणि पालकांना आर्थिक फटका बसला आहे. आज रविवार, ता. २ सप्टेंबर ची ही परिक्षा रद्द करण्यात आली असून, ती गणपती सणानंतर पुन्हा घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या परीक्षेची तारीख, स्थळ बँकेच्या वेबसाईट वर गणपती उत्सवानंतर जाहिर करण्यात येईल. त्यानंतर एकच गोंधळ उडाल्याचे चित्र बघायला मिळत होते. परीक्षार्थी उमेदवार आणि पालक यांचा महाविद्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला.
परिक्षा गोंधळाबद्दल रत्नागिरी जिल्हा मध्य. सहकारी बँकेचे पदाधिकारी अजय चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की जिल्हा बँकेतील ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यापासून ते परिक्षा घेणे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एजन्सी नेमण्यात आली आहे. म्हणून ही परिक्षा सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी त्यांची आहे. ही परिक्षा केंद निवडता सर्व सुविधा तपासून, विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या परिक्षा शुल्काच्या रक्कमेतून, सुविधा पुरविणाऱ्या इन्स्टिटय़ूट ला परीक्षेचे प्रती परीक्षार्थी शुल्क दिले जाते. विनामूल्य सेवा घेतलेली नाही. त्यामुळे ही ऑनलाईन परिक्षेतची संगणक, इंटरनेट सुविधा सुरळीत पुरविण्याची जबाबदारी घरडा इन्स्टिटय़ूट ची होती. यामध्ये बँकेचा थेट संबंध नसताना नाहक विद्यार्थी पालकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ आमच्यावर आली.