अशोक दळवी यांच्या हस्ते शिधा वाटप..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 17, 2023 12:52 PM
views 142  views

सावंतावडी : माजगाव सावंतवाडी येथे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते गणेश चतुर्थी निमित्त शिधा वाटप कार्यक्रम करण्यात आला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय माजगावकर, विभाग प्रमुख उमेश गावकर, शाखाप्रमुख राकेश सावंत, विठोबा कोळेकर ,भिरु कोळेकर व इतर कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्यावतीने यासाठी शिवसेना शिंदे गटाचे आभार मानण्यात आले आहेत.