
सावंतवाडी : शहरातील रासाई युवा कला क्रिडा नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गा मातेचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकीने आगमन करण्यात आले. या मंडळाचे यंदा २५ वे वर्ष असून पुढील ९ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिमखाना लाखेवस्ती येथील रासाई मंडळाच्या देवीला येथील भाविक रोहन खोरागडे यांनी चांदीचे सुर्दशन तर शांता पाटील यांनी चांदीची पैजण अर्पण केली आहे. नवरात्रारोत्सवाला प्रारंभ झाला असुन या पार्श्वभूमीवर दोघांनी हे दागिने अर्पण केले आहेत. यासाठी मंडळाच्या माध्यमातून त्या दोघांचे आभार मानण्यात आले.