राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेज सावंतवाडीचा निकाल ९८.५० %

मुनिरा मिर्झा ९०.३३ % प्रथम
Edited by: विनायक गावस
Published on: May 25, 2023 16:32 PM
views 113  views

 राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेज सावंतवाडीचा निकाल ९८.५० % एवढा लागला आहे. यात प्रशालेत मुनिरा मिर्झा  ९०.३३ % प्रथम, द्वितीय केतकी नाईक ८९.८३% तर तृतीय क्रमांक देवयानी केसरकर, विरेश सातार्डेकर, जान्हवी सावंत, एल्टन फर्नांडिस यांनी पटकाविला आहे.

आर्ट्स विभागात मुनिरा मिर्झा  ९०.३३ % प्रथम, देवयानी कोरगावकर ८९.६७ % द्वितीय, विरेश सातार्डेकर ८६.६७ तृतीय तर कॉमर्स शाखेत केतकी नाईक ८९.८३ % प्रथम, जान्हवी सावंत ८९.६७% द्वितीय, निशिता बावकर ८९.३३% तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर विज्ञान शाखेत एल्टन फर्नांडिस ८९.६७ % प्रथम, समिक्षा पावसकर ८४.०० % द्वितीय, संजीव मसुरकर ८३.०५% तृतीय क्रमांक प्राप्त केला.

मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये अंतरा जाधव ६५.००% प्रथम, दिव्या परब ६४.००% द्वितीय, विशाल गायचोर ६०.००% तृतीय तर कंन्ट्रक्शन टेक्नॉलॉजीत विठ्ठल गावडे ६९.३३% प्रथम, कुणाल पेडणेकर ६७.१७ % द्वितीय, अर्जून परब ५९.१७ % तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीत १०० पैकी १०० गुण पुजा सरमळकर, सिद्धी कुबडे, हर्षिता सुर्यवंशी, ज्योती नाटलेकर यांनी प्राप्त केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाचालक व मुख्याध्यापक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.