
चिपळूण : होळी सणातील बालगोपाळांसह सर्वांचाच आवडता दिवस म्हणजे रंगपंचमी. निसर्गात होणाऱ्या रंगाच्या उधळणाच्या पार्श्वभूमीवर, सर्वच या रंगोत्सवात आनंदाने सहभागी होतात. आज चिपळूण शहरातही हा रंगाचा सण बालगोपाळांसह आबालवृद्ध, महिलांनी एकत्रित विविध रंगांमध्ये रंगून जात आनंदाने साजरा केला.