PHOTO STORY ; वाडीची रंगपंचमी !

रंगांची उधळण करत थिरकले अबालवृद्ध
Edited by: विनायक गांवस
Published on: March 28, 2024 12:50 PM
views 544  views

सावंतवाडी : शिमगोत्सव विविधांगी पद्धतीने साजरा करण्याची प्रथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सावंतवाडी शहरात आज पाच दिवसांचा रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला.


रंगपंचमी निमित्ताने तरुणाई रस्त्यावर उतरली होती. डीजे, ढोल ताशाच्या तालावर अबालवृद्ध थिरकताना पहायला मिळाले. महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.


ठिकठिकाणी युवक-युवतींनी रंगपंचमी साजरी करत रंगपंचमीचा आनंद लुटला. नैसर्गिक रंगांचा वापर अधिक प्रमाणात करण्यात आला.


जयप्रकाश चौक, सालईवाडा, वैश्यवाडा, चिताराळी, उभाबाजार, माठेवाडा, सबनिसवाडा, खासकीलवाडा आदी परिसरात मोठा उत्साह पहायला मिळाला.


डिजेच्या तालावर थिरकत युवाईन रंगाची उधळण केली. काही ठिकाणी रेन डान्स करण्यात आले. देव इसवटी महापुरुष मंदिर सबनिसवाडा येथील रोंबाट सालाबादप्रमाणे होळीचा खुंट येथे दाखल होत आरती केली.


रंगात नहालेली युवाई सायंकाळी मोती तलावाच्या काठावरून गाड्यांवरून फेरफटका मारताना दिसली. रंगपंचमी निमित्त संपूर्ण सावंतवाडी रंगात नाहून गेली होती.