कुडाळात 28 ऑक्टोबरला रांगोळी स्पर्धा !

सावंतवाडी संस्थान मराठा समाज कुडाळ संचलित भगिनी मंडळाच्यावतीने आयोजन
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 25, 2023 19:10 PM
views 196  views

कुडाळ : सावंतवाडी संस्थान मराठा समाज कुडाळ संचलित भगिनी मंडळाच्या वतीने 28 ऑक्टोबरला रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अनिल उर्फ बंड्या सावंत यांनी दिली.

मराठा समाज येथील वातानुकूलित हॉल येथे सकाळी 11 वाजता गड किल्ले या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. सोळा वर्षावरील खुल्या गटातील स्पर्धकांनी सहभागी होता येणार आहे तर प्रथम येणाऱ्या 25 स्पर्धकांना प्राधान्य देण्यात  येणार आहे. तर नाव नोंदणी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी करण्यात येणार आहे.अशी माहिती अनील उर्फ बंड्या सावंत यांनी दिली.