नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवेमध्ये रंगली संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धा

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 02, 2023 11:44 AM
views 119  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे मध्ये संस्कृत दिनाचे औचित्य साधून संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन संस्कृत विभाग प्रमुख ओंकार अनंत गाडगीळ यांनी केले होते.

या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला जवळजवळ 70 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली पहिला गट इयत्ता पहिली ते चौथी, दुसरा गट इयत्ता पाचवी ते सातवी, आणि तिसरा गट इयत्ता आठवी ते दहावी या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे गट क्रमांक एक प्रथम क्रमांक-श्रुती कावळे इयत्ता तिसरी,द्वितीय क्रमांक -शुभ्रा चिके इयत्ता चौथी ,तृतीय क्रमांक सई तावडे,गट क्रमांक दोन प्रथम क्रमांक- आयशा पटेल इयत्ता सातवी ,द्वितीय क्रमांक कांचन अडुकर इयत्ता पाचवी, तृतीय क्रमांक-माही दयानी इयत्ता सहावी, गट क्रमांक तीन प्रथम क्रमांक-  महवीश मुल्ला, द्वितीय क्रमांक- साद काझी इयत्ता दहावी, तृतीय क्रमांक- यासीर मुकादम इयत्ता नववी. या स्पर्धेचे परीक्षण शाळेतील सहशिक्षिका जान्हवी हर्डीकर आणि सिद्धी जोशी यांनी केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई यांनी अभिनंदन केले.ही स्पर्धा यशस्वी करण्यास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.