राणेंची भेट वैयक्तिक संबंधांपोटी : गौरीशंकर खोत

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 23, 2024 09:30 AM
views 491  views

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे व आमदार नितेश राणे यांची ठाकरे शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी मुंबई येथे भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या. या भेटीमुळे शिवसेना उबाठा गटात जोरदार खळबळ उडाली होती.

यावर ठाकरे शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत यांनी आपल्या फेसबुक पेजवर मी शिवसेनेतच असुन, पक्षाशी एकनिष्ठ आहे. कुणीही भोंगळ राजकरण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते त्याचे त्याला लखलाभ अशी प्रतिक्रिया खोत यांनी व्यक्त केली आहे.