केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यावर राणेंनी अनेक चांगले निर्णय घेतले : नीलम राणे

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 14, 2024 06:13 AM
views 158  views

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास नारायण राणे यांच्यामुळे झाला. गेल्या अडीच वर्षात केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यावर उद्योगाबाबत नारायण राणे यांनी अनेक निर्णय घेतले. जिल्ह्यात 200 कोटी खर्च करून ट्रेनिंग सेंटर उभे करण्याचे काम नारायण राणे यांनी केले. यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत नामदार नारायण राणे यांना मत देऊन मोदींचे हात बळकट करा असे आवाहन नीलम ताई राणे यांनी पाटगाव येथील महिला मेळाव्यात केले. पाटगाव येथे  सरकारच्या लाभार्थी महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष  श्वेता कोरगावकर, अस्मिता बांदेकर मेघा गांगण, सुमेधा पाताडे, ज्योती पाळेकर,देवगड तालुका महिला तालुकाध्यक्ष संजना आळवे, उषःकला केळुसकर, प्रियांका साळस्कर, तनवी चांदोस्कर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम माजी सभापती रवी पाळेकर, बाळ खडपे बंड्या नारकर उपस्थित होते.

मोदी सरकार आल्यावर देशात सकारात्मक बदल झाले. महिलांसाठी अनेक योजना आल्या. महिलांना न्याय मिळाला. पुन्हा मोदी सरकार येणार आहे.  यामुळे नारायण राणे पुन्हा खासदार होण्यासाठी आपल्या मताची गरज आहे. केवळ आपण नाहीतर शेजाऱ्या पाण्यातील महिलाना ही मतदानासाठी सांगावे असे आवाहनही नीलमताई राणे यांनी केले.