राणेंनी बेरोजगार उमेदवारांच्या डोळ्यात धूळ फेकली : योगेश धुरी

Edited by: भरत केसरकर
Published on: June 09, 2023 20:27 PM
views 213  views

कुडाळ : स्थानिक डीएडच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून सेवेत रुजू करावे अशी मागणी युवा सेनेने या आधी देखील शिक्षणमंत्री यांच्याकडे केली होती. आंदोलकात गट निर्माण करून हे आंदोलन मोडून काढले आणि स्वतः या आंदोलकांना राणेंनी भेट दिली. तसेच या आंदोलकांना राणेंनी शब्द दिला की मी तुमचं काम करून देईन. परंतु तब्बल एक महिना मुंबई वारी करून त्या बेरोजगारांच्या डोळ्यात धुळ फेकली, असा आरोप योगेश धुरी यांनी केलाय. 

मुख्यमंत्र्यांनी राणेंनी सांगितलं की जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून शिक्षक नेमता येणार नाहीत.  काही डीएडचे उमेदवार या संदर्भात राणेंची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु राणे त्यांना भेट देण्याचे टाळत आहेत. आता एका अर्थाने शिक्षण मंत्री यांचा दबदबा मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आहे असे दिसते. युवासेना मात्र गप्प बसणार नाही. आम्ही स्थानिक उमेदवार यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवु. शिक्षणमंत्री हे जरी महाराष्ट्राचे असले तरी त्यांना आमदार मात्र इथल्या जनतेने केला आहे. जनतेच्या मतांवर निवडून येऊन ते शिक्षणमंत्री झालेत. परंतु आता मात्र ज्यावेळी जनतेला त्यांची गरज आहे तर ते आता कायद्याच्या गोष्टी सांगू लागलेत. सगळ्याच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भरतीत स्थानिकांना जोपर्यंत प्राधान्याने नोकऱ्या मिळत नसतील तर युवासेना रस्त्यावर उतरून भूमिपुत्रांसाठी लढेल.