देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत राणेंना जास्त मताधिक्य

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 11, 2024 13:58 PM
views 196  views

देवगड : कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड तालुक्यात महायुतीतील भाजपचे उमेदवार खासदार नारायण राणे यांना १६ हजार ६१६ हजार मतांचे मताधिक्य मिळाले. तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागात मतदारांनी देखील नारायण राणे यांचे नेतृत्व मान्य करीत त्यांना भरघोस मतदान केले. तसेच देवगड पंचायत समिती हद्दीतून देखील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे यांना मताधिक्य मिळाले आहे. येथील भाजपाने आज पत्रकार परिषद घेऊन मतदारांचे आभार मानले आहेत.

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील सर्वच बूथ वर महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनीच आघाडी घेतली देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील पंधरा बूथ मधून सुमारे 2524 मतांचे मताधिक्य नारायण राणे यांना मिळाले आहे. तसेच नगरपंचायत हद्दीत 11223 मते असून यापैकी 7240 मते मतपेटीत पडली पैकी नारायण राणे यांना 4729 मते मिळाली असून विरोधी उमेदवार विनायक राऊत यांना 2205 मते मिळाली आहेत.देवगड जमसांडे नगरपंचायत हद्दीत आमदार नितेश राणे यांनी जी विकास कामे केली याला मतदारांनी पोचपावती दिली आहे. त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास कायम ठेवला आहे.

यापुढेही देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी खासदार नारायण राणे व आमदार नितेश राणे हे प्रयत्न करतील असा विश्वास यावेळी पण उपस्थितांमधून  व्यक्त करण्यात आला आहे.

या पत्रकार परिषदेला देवगड जामसंडे नगरपंचायतीतील भाजपाचे गटनेते शरद ठुकरुल माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रणाली माने, बाळ खडपे, भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी दया पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य वैभव बिडगे, महिला तालुकाध्यक्ष उषःकाला केळुस्कर, पदाधिकारी तन्वी शिंदे, उल्हास मंचेकर, वैभव कळंगुटकर व सर्व नगरसेवक आदी उपस्थित होते.