राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद सादरीकरणात रामगड हायस्कूल आणि शिरशिंगे हायस्कूल प्रथम

"विज्ञानाची कास धरून सिंधुदुर्ग जिल्हा वैज्ञानिक क्षेत्रातही अग्रेसर बनवा," शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 19, 2022 21:30 PM
views 157  views

सावंतवाडी : राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद 2022 23 चे जिल्हास्तरीय ऑनलाईन सादरीकरण नुकतेच संपन्न झाले. प्रदर्शनाचे ऑनलाईन उद्घाटन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी बोलताना डॉ. शेख म्हणाले, "आपला सिंधुदुर्ग जिल्हा शिष्यवृत्ती, दहावी, बारावी या परीक्षांमध्ये अग्रेसर राहिलेला आहे. शासनाच्या विविध शैक्षणिक योजना राबवताना सुद्धा जिल्हा आघाडीवर असतो. आजच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून, दैनंदिन जीवनातील विविध घटनांमधील वैज्ञानिक तत्व जाणून घेऊन वैज्ञानिक क्षेत्रातही आपल्या जिल्हा अग्रेसर बनवण्यासाठी प्रयत्नशील रहावे,"

       राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद २०२२ चा मुख्य विषय *"परिसंस्था आणि सामाजिक स्वास्थ्य"* हा होता. या विषयावर विद्यार्थ्यांनी संशोधनपर प्रकल्प सादर केले होते. या स्पर्धेचे परीक्षण सत्यपाल लाडगावकर आणि गणेशभाऊ राजम यांनी केले. 

          यावेळी जिज्ञासा ट्रस्ट ठाणेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील  घटकांचे निरीक्षण करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करावा असे त्यांनी आवाहन केले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी जिज्ञासा ट्रस्ट, ठाणेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे, राज्य समन्वयक विश्वास कोरडे, जिल्हा समन्वयक गुरुनाथ ताम्हणकर, सुरेश ठाकूर व जिल्ह्यातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते.


जिल्हास्तरीय सादरीकरणाचा निकाल पुढीलप्रमाणे 

१)लहान गट

 *प्रथम क्रमांक-* ओमतेज उल्हास तारी व तन्मय बाबू परब - प्रगत विद्यामंदिर रामगड, तालुका मालवण.


 *द्वितीय क्रमांक-* युक्ता प्रसाद सापळे व जान्हवी प्रवीण कुडतरकर - मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी


 *तृतीय क्रमांक-* मधुकर रमेश वाडकर व सोहम अमोल बागवे - भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल, मसुरे 


💫 *२मोठा गट-* 

 *प्रथम क्रमांक-* अपूर्वा अजित देसाई व आर्या अनिल घाडी - पावणाई रवळनाथ विद्यामंदिर शिरशिंगे


 *द्वितीय क्रमांक-* आर्या सुनील देसाई व नियती मिनापा चव्हाण- मदर क्वीन इंग्लिश स्कूल, सावंतवाडी


 *तृतीय क्रमांक-* वैष्णवी नारायण जिकडे व  साक्षी रविंद्र जिकमडे- प्रगत विद्यामंदिर रामगड, ता. मालवण

           यशस्वी स्पर्धकांची राज्यस्तरीय सादरीकरणासाठी निवड झाली आहे. त्यांना जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.