रमेश भोगटे यांचे निधन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 30, 2026 10:49 AM
views 65  views

कणकवली : फोंडाघाट - हवेलीनगर येथील रमेश विठ्ठल भोगटे यांचे बुधवारी कोल्हापूर येथील खाजगी  रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी  फोंडाघाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रमेश हे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक म्हणून कार्यरत होते. ते किराणा मालाचे घाऊक व्यापारी म्हणूनही परिचित होते.

सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले. साई मंदिराचे सचिव म्हणून त्यांनी सेवा बजावली. सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्थेचे माजी संचालक म्हणून त्यांनी संस्थेच्या विकासात मोलाची भूमिका निभावली. बालगोपाल मित्रमंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि राधाकृष्ण मित्रमंडळाचे संचालक म्हणूनही त्यांनी समाजकार्याची परंपरा जपली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून, भाऊ, बहीण, नातवंडे असा परिवार आहे.