
कणकवली : कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची गावडेवाडी येथील मतदान केंद्रावर सायंकाळी ५.३० वाजता संपली होती. पण ५.३० वाजेपर्यंत जे मतदार रांगेमध्ये होते त्यांना चिठ्ठ्या देण्यात आल्या होत्या शेवटची चिठ्ठी दिलेल्या मतदाराचा क्रमांक येईपर्यंत या रांगेत असलेल्या मतदारांना मतदान केले.
त्यामुळे सरपंच पदाचे उमेदवार असलेले रामदास विखाळे यांनी सगळ्यात शेवट म्हणजे सायंकाळी 7:30 वाजता आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. या प्रभाग क्रमांक तीन मध्ये एकूण 1343 मतदार आहेत.यामध्ये काही ज्येष्ठ नागरिकांमुळे मतदानाला गर्दी लागत असल्याचे उपस्थित निवडणूक अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक विनोद कांबळे व कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हूंदळेकर यांनी देखील या ठिकाणी भेट देऊन मतदान सुरळीत पार पाडावे यासाठी खबरदारी घेतली होती.