
सावंतवाडी : शिवसेना नेते, माजी मंत्री रामदास कदम यांच्या बॅनरवर केलेल्या जोडेमार आंदोलनातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रुपेश गुरुनाथ राऊळ, चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, चंद्रकांत शिवराम कासार, मायकल फ्रान्सीस डिसोजा, शब्बीर अब्दुलसत्तार मणियार, गुणाजी अर्जुन गावडे, अपर्णा प्रशांत कोठावळे यांची सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींतर्फे ॲड. नीता गावडे व ॲड. कौस्तुभ गावडे यांनी काम पाहिले.