समृद्ध कृषी सहकार संस्था - कुणकवळेच्या अध्यक्षपदी रामचंद्र पवार

उपाध्यक्ष पदी महेश जुवाटकर बिनविरोध
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 14, 2023 18:52 PM
views 135  views

मालवण : समृद्ध कृषी सहकार संस्था - कुणकवळेच्या अध्यक्षपदी रामचंद्र पवार, उपाध्यक्ष पदी महेश जुवाटकर यांची बिनविरोध निवड झाली. सन २०२३ -२४ ते २०२७-२८ या कालावधीसाठी ही कार्यकारिणी असणार आहे.


मालवण तालुक्यातील कुणकवळे येथील समृद्ध कृषी सहकार संस्थेच्या सन २०२३-२४ ते २०२७-२८ या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिवप्रसाद चौकेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध निवडून आले. अध्यक्ष पदी रामचंद्र पवार, उपाध्यक्ष पदी महेश जुवाटकर तर संचालक पदी दिगंबर कदम, बाळकृष्ण मसुरकर, जयराम पवार, प्रशांत पवार, संजय पाताडे, सुधाकर राणे, दत्ताराम सावंत, संदीप कदम, मंगेश बुट्टे, स्मिता पवार, सुहासिनी पवार यांची निवड करण्यात आली आहे.