
वैभववाडी : तालुक्यातील उंबर्डे धनगरवाडा येथील रामचंद्र जानू काळे(५१) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत(चेंबूर) येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उंबर्डेत अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेत असताना त्यांनी रस्त्यातच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनामुळे उंबर्डे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, तीन मुलगे, भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक पांडुरंग काळे यांचे ते बंधू तर कोकिसरे माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका पल्लवी काळे यांचे ते दीर होत.