
सावंतवाडी : भाजप सावंतवाडीतून तयारीत आहे. २८८ मतदारसंघातही आमची तयारी सुरू आहे. मात्र, आमचे नेते महायुतीचा निर्णय घेतील. त्यांचा निर्णय हा अंतिम रहाणार आहे. रामदास कदमांच आता वय झालं आहे. रविंद्र चव्हाणांची ते माफी मागत नाही तोवर शिवसेनेच्या बैठकीत बसणार नाही अशी भुमिका माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, शिवसेनेच्या रामदास कदम यांचा निषेध करतो. रविंद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. ठाण्यापासून सिंधुदुर्ग पर्यंतच्या लोकसभेच्या विजयाचे शिल्पकार रविंद्र चव्हाण आहेत. महायुती म्हणून सगळ्यांना ताकद देण्याच काम केले. रामदास कदम स्वतःच्या विधानसभेत मागे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांना आवरण्यासाठी मागणी करणार, रामदास कदमांच आता वय झालं आहे.हा रस्ता केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे. रस्ता झाला नाही ही सत्य परिस्थिती असली तरी रविंद्र चव्हाण यांच्यामुळे बरीच काम झाली. जोपर्यंत रामदास कदम माफी मागत नाही तोवर शिवसेनेच्या बैठकीला जाणार नाही असा पवित्रा आम्ही घेतला आहे अस मत माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केले.
माजी केंद्रीय मंत्री खा.नारायण राणे हे कोकणचे नेते आहेतच. पण, त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी होती. रविंद्र चव्हाण यांच्यावर कोकणची जबाबदारी होती. भाजपची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकावर जबाबदारी दिली होती. मोठ्या नेत्यांवर सामुदायिक राज्याची जबाबदारी दिली होती. त्यामुळे यात गल्लत होऊ नये असं श्री.तेली म्हणाले.
कामासाठी व दर्जेदार रस्त्यासाठी जगात नाव घेतलं जाणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील कोकणच्या हायवे समोर हात टेकले. त्यांनी स्वतः असं विधान केलं. देशात चांगले रस्ते घडवताना कोकणात अनेक अडथळ्यांना सामना करावा लागला. रविंद्र चव्हाण यांनी मंत्री म्हणून यासाठी प्रयत्न केले. आज हा प्रश्न मार्गी लागत आहे. ठेकेदार, कोर्ट प्रकरणामुळे हे काम रखडले. सिंधुदुर्गसारख काम रत्नागिरी, रायगडमध्ये झालं असतं तर ही अवस्था नसती. रविंद्र चव्हाण यांच्यामुळे काम सुरू तरी झालेली दिसत आहेत. रस्ता पुर्ण न होण्यासाठी अनेक कारणे आहेत. भाजप सावंतवाडीतून तयारीत आहे. २८८ मतदारसंघातही आमची तयारी सुरू आहे. मात्र, आमचे नेते महायुतीचा निर्णय घेतील. त्यांचा निर्णय हा अंतिम रहाणार आहे. यावेळी किसान मोर्चाचे अध्यक्ष अजय सावंत उपस्थित होते.