
सावंतवाडी : वाळूचोर रामदास कदम रविंद्र चव्हाण यांच्यावर बोलला. त्यांची आमच्या नेत्यांवर बोलायची लायकी नाही. जोपर्यंत रामदास कदम माफी मागत नाही, तोपर्यंत इथे शिवसेनेशी युती करणार नाही, युती धर्म पाळणार नाही. कदमांना माफी मागायला लावा अन्यथा तुमच्यावर बहिष्कार टाकणार, महायुतीन उमेदवार दिला तरी प्रचार करणार नाही. महायुतीच्या कोणत्याच कार्यक्रमाला भाजप कार्यकत्यांनी उपस्थित राहू नये. माफी मागितल्यावर सोबत बसू अस मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केलं.
ते म्हणाले, रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याची रामदास कदम यांची उंची नाही. जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत हे वातावरण असंच राहणार आहे. रामदास कदम यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा यापुढे महायुतीमध्ये भाजपचा काही संबंध राहणार नाही. अथवा कोणत्याही निवडणुका यापुढे आम्ही महायुती म्हणून लढवणार नाहीत असा इशारा देखील श्री. परब यांनी यावेळी दिला.यावेळी संदीप गावडे, परीक्षीत मांजरेकर, सचिन साटेलकर, मोहिनी मडगावकर आदी उपस्थित होते.