
देवगड : कुणकेश्वर मंदीर येथे धामिर्क स्थळे(मंदीर) स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे, आ.नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार अजित गोगटे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, तहसिलदार विशाल खत्री, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर, देवस्थान टड्ढस्ट अध्यक्ष संतोष लब्दे, संदीप साटम, बाळा खडपे, एकनाथ तेली, प्रकाश राणे आदी उपस्थित होते.
अयोध्यामध्ये साकारलेले श्रीराम मंदीर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले.सोमवारी अयोध्या येथे रामलल्ला प्रतिष्ठापना होत असलेला क्षण हा भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहावा असा क्षण आहे.असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुणकेश्वर मंदीर येथे केले. यावेळी राष्टड्ढवादीचे नेते शरद पवार यांनी केलेल्या टीकेवरही ना.राणे यांनी जोरदार टीका केली आहे.
ना.नारायण राणे यांच्या हस्ते कुणकेश्वर मंदीरातील नंदी व मंदीर परिसर पाण्याने स्वच्छ करून स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना ना.राणे यांनी देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारखे कर्तृत्ववान पंतप्रधान लाभले असून त्यांच्यामुळेच देशाची वाटचाल महासत्ता होण्याकडे सुरू आहे.जगात अकराव्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था आज पाचव्या स्थानावर पोहचली असून २०३० पर्यंत ती तिसèया स्थानावर पोहचून भारत महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अयोध्या येथे साकारलेले श्री रामलल्लांचे मंदीर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य झाले.मोदी आपल्या कार्यकाळातच देशाला आत्मनिर्भरतेकडे व महासत्तेकडे घेवून जात आहेत.मोदीच देशाला प्रगतीपथावर नेतील असा विश्वास ना.राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्टड्ढवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राममंदीराची जागा बदलली असे विधान करून टीका केली.या टीकेचा ना.राणे यांनी समाचार घेतला.शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री अशी पदे भुषविली मात्र केवळ मोदींवर टीका करण्याचे काम ते सध्या करीत आहेत.
आमदार नितेश राणे यांनी कुणकेश्वरचा विकासामध्ये ना.राणे यांचे फार मोठे योगदान आहे जसे महाकाल मंदीर, काशीविश्वेश्वर मंदीर याचा विकास झाला त्याच धर्तीवर कुणकेश्वर मंदीराचा विकास होण्यासाठी ना.राणे यांनी मोठ्या प्रमाणात केंद्राकडून निधी मिळविला आहे . व याबाबतचा पाठपुरावाही नामदार नारायण राणे साहेबांकडून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावातील मंदिरे स्वच्छ करण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी विचार व्यक्त केले.सुत्रसंचालन रामदास तेजम यांनी केले.कुणकेश्वर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच महेश ताम्हणकर, ग्रामसेवक गुणवंत पाटील यांनी ना.राणे यांचे स्वागत केले.
यावेळी कारसेवा बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टिके बाबत नामदार नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी विरोधकांची टीका ही उगाचच आहे. राजकारणातील सभ्यता सोडून केलेली टीका आहे.ते गेले म्हणून त्यांचा फोटो व्हायरल झाला असावा तुमचा एखादा झालाय का?असा प्रश्न केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी विरोधकांना विचारला आहे.