सावंतवाडीत रामजन्मोत्सव होणार साजरा...!

Edited by: विनायक गांवस
Published on: April 11, 2024 07:12 AM
views 182  views

सावंतवाडी : विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजा तर्फे नारायण मंदिर सावंतवाडी येथे श्री रामजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष केशव फाटक यांनी दिली.

ते म्हणाले, सकाळी ११.३० वाजता वेदशास्त्र पाठशाळा सावंतवाडी विद्यार्थ्यांचे मंत्र पठण होणार आहे. १२ वा. रामजन्म होणार आहे. सायं. ४.३० वाजता शोभा यात्रा, या मध्ये झांज पथक, भजन, ढोल पथक, डीजे, शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध मंडळांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ६.०० वाजता किरण सिध्दये यांचे अभिनव संगीत विद्यालय माठेवाडा यांचा गीत रामायण संगीताचा कार्यक्रम तर रात्रौ ९.३० वाजता श्री देव सात पाटेकर दशावतारी नाट्य मंडळ निरवडे यांचा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे श्री देव नारायण मंदिर येथून शोभायात्रा सुरु होऊन नगरपरिषद एसपीके कॉलेज, शासकीय गोदाम, मिलाग्रीस हायस्कूल, हनुमान मंदिर, जयप्रकाश चौक, गांधी चौक येथून श्री देव नारायण मंदिराकडे शोभायात्रेचा समारोप होईल अशी माहिती दिली. तर यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केशव फाटक यांनी केल. तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या माध्यमातून श्री रामनवमी निमित्ताने सावंतवाडी येथे रामकथेचे आयोजन केले आहे. १५ व १६ एप्रिल रोजी सायं. ५.३० ते ८ तर १७ एप्रिलला सकाळी १० ते १ या वेळेत तीन दिवसीय रामकथा, भरत मिलन या विषयावर कृष्ण नाम प्रभुजी  प्रवचन देणार आहेत. तरी हरेकृष्ण संस्कार केंद्र, भटवाडी येथे या रामकथेचे श्रवण करुन भगवान श्री रामचंद्रांची कृपा प्राप्त करावी असं आवाहन प्रकाश रेडकर यांनी केलं आहे. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष केशव फाटक, प्रखंड मंत्री विनायक रांगणेकर, प्रसिद्धी प्रमुख किशोर चिटणीस, प्रसाद अरविंदेकर, प्रकाश रेडकर, अण्णा म्हापसेकर, राजू केळूसकर आदी उपस्थित होते.