
सावंतवाडी : प्रांताधिकारी प्रशासक म्हणून काम पहात असलेल्या सावंतवाडी नगरपरिषदेचा कारभार रामभरोसे चालला आहे. मुख्याधिकारी यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याने शुल्लक कामासाठी पालिकेत हजारदा हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेली दोन अडीच वर्ष नगरपरिषदेवर प्रशासकीय राजवट आहे. लोकसेवक सभागृहात नसल्याने नागरिकांना वाली उरले नाही आहेत. शुल्लक कामासाठी देखील पालिका अधिकारी वेळकाढूपणाच धोरण राबलित आहे. नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. असेसमेंट उतारे देण्यास विलंब होत आहे. डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून नव्या कोऱ्या फॉगिंग मशीन नेमक्या कुठे धुळ खात आहेत ? हा प्रश्न आहे. शहराच्या सीमेवर कचऱ्याच साम्राज्य पसरले आहे. शहरातील काही भागातील रस्ते खचलेले आहेत. भुमिगत लाईनसाठी रस्त्यावर मारलेले चर चुकीच्या पद्धतीने भरल्याने अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. नागरिकांचे सेवक पालिकेत नसल्याने प्रशासनाचा रामभरोसे कारभार सुरू आहे. त्यामुळे हक्काचे सेवक निवडून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणूका लवकरात लवकर घ्याव्या अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे.