रक्षाबंधनाला मिठाईच्या दुकानात गर्दी | विविध प्रकारची मिठाई उपलब्ध

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 30, 2023 14:24 PM
views 349  views

कणकवली : सण उत्सव समारंभ म्हटलं की पहिला गोड कोणता पदार्थ घ्यायचा हा विचार करावा लागतो म्हणूनच आज रक्षाबंधन निमित्त बहीण भावाचं तोंड गोड करण्यासाठी मिठाई बर्फी काजू करी गुलाबजाम लाडू या गोड पदार्थांची खरेदी करते. त्यासाठी कणकवली बाजारात रक्षाबंधन निमित्त विविध प्रकारच्या मिठाई ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहेत. पटवर्धन चौकामधील समीर स्वीट स्मार्ट व आस्था विक्री यांनी यांनी तर मिठाई मध्ये तब्बल 50 पेक्षा जास्त विविध प्रकारच्या मिठाई आज बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत.

यामध्ये बर्फी, मँगो बर्फी ,बटरस्कॉच ,गुलकंद बर्फी ,अंजीर बर्फी, काजू कत्री, गुलाबजाम, ड्रायफूड, सुतार फेणे, बुंदी लाडू, पेढे ,पेढे केशरी,  बालुशाही, बदाम हलवा, माहीम हलवा, यासह विविध प्रकार बाजारात उपलब्ध झाल्याने ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात मिठाईची खरेदी करत आहेत.