
चिपळूण : तालुक्यातील खडपोली येथील कृष्णा अँटिऑक्सिडंट कंपनीत रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल, खडपोली येथील विद्यार्थिनींनी कंपनीत येऊन सर्व कर्मचारी बांधवांना राखी बांधून हा दिवस साजरा केला.
यावेळी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करताना, कंपनीमार्फत शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम आमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. शहरातील शाळांप्रमाणेच दर्जेदार शिक्षण गावातील शाळांमध्येही मिळावे, या उद्देशाने कंपनी करीत असलेल्या कार्यामुळे आम्हाला शहरात जाण्याची गरज नसल्याचे त्या म्हणाल्या. “तुम्हीच आमचे लाडके भाऊ आहात” अशा भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.
शाळेतील प्राध्यापिकांनी आभार प्रदर्शन करताना सांगितले की, शाळेला कधी मदतीची गरज लागल्यास कृष्णा अँटिऑक्सिडंट कंपनी सर्वप्रथम मदतीला धावून येते. कंपनीचे व्यवस्थापक अशोक पाटील व सुयोग चव्हाण यांना फक्त एक फोन केला की आवश्यक काम तातडीने पार पडते. आजवर दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानत पुढील सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.