
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील युवासेना पदाधिकारी नेमणूका जाहीर करण्यात आल्या. युवा सेना तालुका संघटक पदी राकेश नामदेव धरणे यांची नेमणूक करण्यात आली. दोडामार्ग शिवसेना कार्यालय येथे नेमणूका करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, समन्वयक शैलेश दळवी व युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, उपतालुका प्रमुख दादा देसाई, तिलकांचन गवस, मायक लोबो, रामदास मेस्त्री, शहर प्रमुख योगेश महाले, गोकुळदास बोंद्रे, गुरूदास सावंत, महीला तालुकाप्रमुख चेतना गडेकर,सान्वी गवस आणि महीला पदाधिकारी, शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी युवासेना नियुक्तीपत्र देण्यात आली.