डॉ. दुर्भाटकरांनंतर सावंतवाडी कॉटेजमध्ये स्त्री-रोगतज्ञ कोण ?

...अन्यथा राजू मसुरकरांप्रमाणे दाखल करावी लागेल जनहित याचिका
Edited by: विनायक गांवस
Published on: May 26, 2023 15:27 PM
views 204  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे स्त्रीरोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर येत्या ३१ मे रोजी ते नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त होत आहे. गेली २३ वर्ष ते याठिकाणी निस्वार्थी पणे सेवा देत होते. सावंतवाडीसह जिल्ह्यात त्यांनी देवदूत म्हणून ओळख प्राप्त केली आहे. त्यांच्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ कोण असणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज डॉ. दुर्भाटर यांच्या नावावर सावंतवाडीसह आजूबाजूच्या प्रदेशातील गर्भवती महिला प्रसृतीसाठी सावंतवाडीत येतात‌. त्यामुळे डॉ. दुर्भाटकर यांच्या जागेवर प्रशासन तात्काळ नव्या अनुभवी स्त्री-रोग तज्ञाची नेमणूक करण आवश्यक होत. परंतु, अद्याप तशा हालचाली दिसत नसल्यानं 2001 साली सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांच्याप्रमाणे जनहित याचिका दाखल करायची वेळ सावंतवाडीकरांवर येणार का हा प्रश्न उद्भवत आहे. 



२००१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी जनहित याचिका दाखल केल्याने 2001 साली सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला डॉ. दुर्भाटर आरोग्य सेवेत प्राप्त झाले होते. त्यापूर्वी चार-पाच वर्षे जिल्हा रुग्णालय ओरोस येथे स्थलांतर झाल्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टर प्रशांत बाड, हृदयरोग तज्ञ व बी.एम.ए. एस (आयुर्वेदिक) डॉक्टर गुड्डे हे दोनच डॉक्टर कार्यरत होते. त्यावेळी राजु मसुरकर यांनी भाईसाहेब आयुर्वेदिक कॉलेजमध्ये मध्ये भेट घेऊन एका वॉचमनच्या पत्नीची पोटातील अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी विनंती केली होती. यावेळी डॉक्टर गुप्ता यांनी ही अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी जनरल सर्जन डॉक्टरची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी डॉक्टर गुप्ता यांना एसटी स्टँड नजिक जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर बोरवले जनरल सर्जन यांना विनंती करून ही शस्त्रक्रिया आयुर्वेदिक कॉलेजमध्ये डॉक्टर गुप्ता व डॉक्टर बोरवले जनरल सर्जन यांनी मोफत केली.

त्यानंतर रोज सायंकाळी राजु मसुरकर आयुर्वेदिक कॉलेजच्या रुग्णालयामध्ये त्या वॉचमनच्या पत्नीची तब्येत विचारपूस करण्यासाठी व कुटुंबीयांना आधार देण्यासाठी जात असत. तिथल्या रुग्णालयाच्या शेजारी असलेले रिक्षा स्टँडच्या चालकांना ही अवघड शस्त्रक्रिया राजू मसुरकर यांच्या विनंतीने मोफत झाल्याने त्या रिक्षा चालकांना ही बातमी लागली.तेथील रिक्षा चालकांनी मसुरकर यांना विनंती करून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता असल्याने गरीब जनतेला कोणी वाली नाही गोरगरिबांवरती तुम्ही लक्ष घाला असे सांगण्यात आले. त्यानंतर राजु मसुरकर यांनी 2001 साली नगरपालिकेचे नगराध्यक्षाची निवडणूक असल्याने काँग्रेस पक्षांतर्गत तिकीट मागितले होते. राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या वादात ते तिकीट राजु मसुरकर यांना नाकारले होते. 2001 साली त्यांनी त्या रागामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीमध्ये राजू मसूरकर हे पराभूत झाल्याने नैराश्य त्यांना आले होते. काँग्रेस पक्षाचे सरकार असताना त्यांना निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून न लढवणे महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे नेते मंडळींकडून आमिष दाखवला होता ते मसूरकर यांनी धुळकावले होते व अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले होते.

काँग्रेसचे पालकमंत्री म्हणून अजित घोरपडे यांना परत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला डॉक्टर पाहिजे हे निवेदन घेऊन न जाता मुंबई उच्च न्यायालयात मध्ये त्यांनी जनहित याचिका दाखल करून काँग्रेस पक्षाच्या सरकार विरोधात स्त्री रोग तज्ञ, जनरल सर्जन अस्थिरोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, डॉक्टर उपजिल्हा रुग्णालय मध्ये नसल्याने त्यांनी ती याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये शासनाच्या विरोधात दाखल करून मुंबई मंत्रालय आरोग्य सचिव सहआरोग्य संचालक पुणे कोल्हापूर उपसंचालक विभाग सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना न्यायालयामध्ये पार्टी करून दावा दाखल केला होता. न्यायालयाने ताशेरे मारत नोकऱ्यांवरती अडचणी येऊ शकतात अशा प्रकारचा गंभीर इशारा मुंबई मंत्रालय आरोग्य सचिवांना दिल्याने एका महिनाभराच्या आत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर दुर्भाटकर त्यांनंतर काही कालावधी नंतर जनरल सर्जन डॉक्टर महेश लाडे त्यानंतर अस्तिरोग तज्ञ डॉक्टर आवटे व तसेच डॉक्टर कश्यप देशपांडे कान नाक घसा तज्ञ डॉक्टर मांगलेकर एमबीबीएस डॉक्टर संदीप सावंत असे विविध प्रकारचे डॉक्टर जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जनहित याचिके नंतर डॉक्टरांना दाखल करून घेतले. तिथून हा प्रवास राजकारणातून आरोग्य सेवेमध्ये राजू मसूरकर यांच्या 23 वर्षे हा प्रवास सुरू झाला. गोरगरिबांची सेवा करणे ही ईश्वर सेवा समजून राजू मसुरकर ही सेवा करत आहे. कुठलाही पक्षभेद जात पात धर्म गोरगरीब रुग्णांना दिलासा व धैर्य देण्याचे अहोरात्र प्रयत्न यामुळे हजारो रुग्णांना एक प्रकारचा धीर देऊन दिलासा दिला आहे. ॲड. बाळकृष्ण उर्फ बाबा टंगसाळी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील तसेच सावंतवाडी चे ॲड. श्रीपाद नातू यांनी या जनहित याचिका करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले अशी प्रतिक्रिया राजू मसुरकर यांनी दिली आहे.


2013 साली सावंतवाडी राजवाडा मध्ये श्रीमती सत्वशीला देवी भोसले यांना राजवाड्यामध्ये भेटण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली असता त्यांना निवेदन देऊन महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना एक लाख पन्नास हजार रुपये पर्यंत 971 प्रकारचे आजार व उपचार मोफत करून मुख्यमंत्र्यांकडून करून घेण्यात आले. तसेच गोवा बांबुळी येथे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यामार्फत सुद्धा ही योजना गोवा बांबुळी येथे मिळावी अशा प्रकारचा प्रयत्न करून ती योजना आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून मंजूर करण्यात आली. त्यामुळे अनेक रुग्णांना याचा दिलासा आजपर्यंत मिळत आहे. त्यानंतर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून तत्कालीन शिवसेना-भाजपच्या सरकारने या योजनेचे नाव महात्मा फुले जन आरोग्य योजना असे ठेवले. ही योजना आजपर्यंत चालू आहे. 


दरम्यान, आज उपजिल्हा रुग्णालयात डॉ. पाटील यांच्यानंतर वैद्यकीय अधिक्षकांचा प्रभारी चार्ज अधिक स्त्री रोग तज्ञ असे दोन काटेरी मुकुट त्यांच्या डोक्यावर होते. तेही निवृत्त होण्यासाठी काहीच महिने शिल्लक असताना. निवृत्तीला काहीच दिवस शिल्लक असताना सुद्धा अद्याप या दोन काटेरी मुकुट असलेल्या पदांवर अन्य डॉक्टर नियुक्त करण्यासाठीच्या हालचाली दिसत नाही आहेत. दुर्भाटकर यांच्यानंतर अनुभवी स्त्री-रोग तज्ञाची नेमणूक न केल्यास गोरगरीबांवर प्रसुतीसाठी हजारो रूपये खर्च करायची वेळ येणार आहे. त्यामुळे त्या आधीच मंत्री व आरोग्य प्रशासनानं या नियुक्त्या करण आवश्यक आहे. अन्यथा राजू मसुरकरांप्रमाणे जनहित याचिका दाखल करावी लागेल.