राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण अभियानाची देवगड केळकर कॉलेज इथं सुरुवात

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 18, 2023 20:49 PM
views 81  views

देवगड : देवगड येथील केळकर महाविद्यालय येथे आज पासून महाविद्यालयीन विद्यार्थिनी व युवतींसाठी महिला व बाल विकास विभाग यांच्या वतीने राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षणअभियानाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून युवती व विद्यार्थिनी यांना सायबर क्राईम, महिला विषयक अपराध, आर्थिक गुन्हे, पोलीस प्रशासन कामकाज याविषयी समाज प्रबोधन व मार्गदर्शन पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांच्या कडून करण्यात आले.यावेळी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी,देवगड कॉलेजच्या महिला प्राध्यापिका व 200 विद्यार्थिनी व युवती हजर होत्या.सदर युवती व विद्यार्थिनी यांना स्वसंरक्षणार्थ कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.अशी माहिती निळकंठ बगळे पोलीस निरीक्षक देवगड,पोलीस ठाणे यांच्या कडून देण्यात आली.