राजकुमारी बगळे, खुशल सावंत यांची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड..!

Edited by:
Published on: September 20, 2023 13:26 PM
views 145  views

सावंतवाडी :  नुकत्याच अहमदाबाद,गुजरात येथे संपन्न झालेल्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये सिंधुदुर्गतील नेमबाज सहभागी झाले होते. यात कु. राजकुमारी संजय बगळे (रा. कुडाळ) हिची एअर पिस्तूल प्रकारात 400 पैकी 342 गुणांसह मुलींच्या सब युथ गटात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली झाली आहे.  ही खेळाडू वेंगुर्ला येथील उपरकर शूटिंग अकॅडमी मध्ये नेमबाजीचा सराव करत आहे. त्याचप्रमाणे एअर रायफल प्रकारात कु. खुशल संभाजी सावंत (यशवंतराव भोसले स्कूल) सावंतवाडी याने मध्य प्रदेश,इंदोर येथे झालेल्या 32 व्या ऑल इंडिया जी. व्ही मावळणकर शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये 400 पैकी 365 गुण मिळवत मुलांच्या सब युथ गटात राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. हा खेळाडू सावंतवाडी येथील शूटिंग रेंजवर नेमबाजी चा सराव करत आहे या दोन्ही खेळाडूंना प्रशिक्षक श्री. कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण मिळाले तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री विक्रम भांगले यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.