
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कुडाळ मधील श्री विनायक व्हिल्स प्रा. लि. ने जगातील टॉप ब्रँड सुझुकी मोटरसायकल इंडिया च्या देशभरातील डिलर मधून राष्ट्रीय स्तरावर 'Highest Vehicle Accessories Sale Per Vehicle' मध्ये उपविजेतेपद पटकावून वर्चस्व गाजवले आहे. नुकत्याच पवई, मुंबई येथे झालेल्या सुझुकी मोटरसायकल इंडिया च्या डिलर कॉन्फरन्समध्ये सन २०२४-२५ मध्ये सुझुकी इंडिया चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री केनिची उमेडा सान यांनी हा पुरस्कार श्री विनायक व्हिल्स प्रा.लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र विश्वनाथ तेरसे यांना प्रदान करून सन्मानित केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्रासाठी ही कौतुकास्पद बाब असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १२५ सीसी स्कूटर सेगमेंटमध्ये सध्याच्या घडीला सुझुकी इंडियाच्या श्री विनायक व्हिल्स डीलरशिपकडे अग्रक्रमाने पाहिले जाते.
सुझुकी मोटरसायकल इंडिया ची डीलर कॉन्फरन्स नुकतीच पवई स्थित दी वेस्टिन हॉटेल, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये श्री विनायक व्हिल्स प्रा.लि. सुझुकी, कुडाळ या डीलरने आपले वर्चस्व सिद्ध केले. श्री विनायक व्हिल्स प्रा. लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर, राजेंद्र विश्वनाथ तेरसे यांना सुझुकी इंडिया चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री केनिची उमेडा सान यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमास सुझुकी इंडिया चे व्हॉईस प्रेसिडेंट श्री दीपक मुथरेजा सांन, देवाशीष हंडा सान, व्यवस्थापकीय संचालक मित्सुमोटो वटाबे हरीकृष्ना सान उपस्थित होते.
या गौरवास्पद वाटचालीबद्दल बोलताना श्री तेरसे म्हणाले, ग्राहकांचे समाधान हेच खरं श्री विनायक व्हिल्स प्रा.लि. विनायक व्हिल्स प्रा. लि. व सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रा.लि. यांचे ध्येय आहे. गेली अनेक वर्ष ग्राहकांचं समाधान आणि दर्जेदार सेवा देण्यात सदैव तत्पर आहे. सुझुकी मोटर सायकल इंडिया प्रा. लिमी.(SMIPL) सुझुकी मोटर सायकल जपान प्रा. लिमिटेड यांच्या वतीने हा आमच्या डीलरशीप मिळालेला हा सन्मान आमच्यावरील ग्राहकांचा विश्वास अधोरेखित करतो. या पुरस्काराने आमची जबाबदारी अधिक वृद्धिंगत झाल्याचेही श्री. तेरसे आवर्जून सांगतात. इतकंच नव्हे तर या सर्व यशात सुझुकीचे पॅरामीटर्स, प्रशिक्षित कर्मचारी, प्रशिक्षण, त्यांनी मिळविलेले सर्टिफिकेट्स, होलसेल ॲक्सेसरीज, सेल्स व सर्विस पॅरामीटर्समध्ये सातत्य ठेवल्यामुळेच हे यशोशिखर गाठणे शक्य झाले असून ते आपल्या टीम व सुझुकी इंडियावर प्रेम करणाऱ्या लाखो ग्राहकांचे, जिल्ह्यावासियांचे विशेष आभार मानले आहेत.