राजे प्रतिष्ठानच्यावतीने आंबोलीत शिवजन्म सोहळ्याचं आयोजन !

Edited by: विनायक गांवस
Published on: March 27, 2024 06:54 AM
views 73  views

सावंतवाडी : तालुक्यातील आंबोली येथील राजे प्रतिष्ठान, कामतवाडी यांच्यावतीने तिथीनुसार शिवजन्मोत्सव सोहळा २७ आणि २८ मार्चदरम्यान साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामतवाडी-आंबोली येथे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

सकाळी कलशपूजन आणि मिरवणूक, मूर्ती अभिषेक, मूर्ती प्रतिष्ठापना पार पडलं. गुरुवारी  सकाळी ६ वाजता शिवज्योत आगमन, ९ वाजता मूर्ती अनावरण, मूर्तिपूजन, मानवंदना, लेझीम प्रात्यक्षिक, ऐतिहासिक चित्रप्रदर्शन, शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, सत्कार समारंभ, मनोगत, शिवव्याख्यान, स्नेहभोजन, पालखी सोहळा, धनगरी नृत्य, पारंपरिक सनई वादन, लेझीम पथक, घुमटवादन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रमुख अतिथी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

आमदार वैभव नाईक, मादी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, शैलेश परब, राजन तेली, लखमराजे भोसले, महेश सारंग, संजू परब, सरपंच सावित्री पालेकर, श्रीकांत गावडे, शशिकांत गावडे, प्रकाश गावडे, केंद्रप्रमुख रामा गावडे, चौकुळ सरपंच बाबू शेटवे, गेळे सरपंच सागर ढोकरे, कानूर सरपंच देवेंद्र नार्वेकर, अवधुतानंद महाराज, परमानंद महाराज स्वामी समर्थ मठ आदी उपस्थित राहणार आहेत.

तर शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांचे शिवचरित्रावर  मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उल्हास गावडे यांनी केले आहे.