श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या जन्मदिनी विविध योजनांचा कारागिरांना लाभ !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 13, 2024 11:15 AM
views 99  views

सावंतवाडी : राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या जन्मदिवसाच औचित्य साधून विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. त्यामध्ये विश्वकर्मा योजना, कामगार कल्याण योजना, घरेलू कामगार योजना आशा विविध योजना राबवण्यात येत असून ५० कारागिरांना याचा लाभ देण्यात आला.

यानिमित्त सल्लागार नारायण  सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर, भाजपा कामगार मोर्चा सावंतवाडी विधानसभा संयोजक सत्यम सावंत,  कल्याण कदम, सौ. पूजा गावडे, सौ. स्वप्ना नाईक, सौ. आशा इंगळे, सौ. संगीता पारधी, सौ. सेजल पेडणेकर, सौ. शेता गावडे, सौ. मनीषा गावडे, सौ. संचिता गावडे, ज्ञानेश्वर पारधी,. संजय गावडे,. सचिन गावडे, अक्षता कुडतकर, सरिता भिसे तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.