समाजाला देण्याची भावना जपणारं राजे प्रतिष्ठान : अण्णा केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: February 25, 2024 07:31 AM
views 86  views

सावंतवाडी : छत्रपती खा. उदयनराजे भोंसले यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठाननं अभिनव व स्तुत्य असा उपक्रम राबविला आहे‌. समाजासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्यांचा गौरव करण्याच काम या प्रतिष्ठाननं केल. समाजाला देण्याची भावना जपणार हे राजे प्रतिष्ठान असल्याच प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर यांनी केले. सावंतवाडी येथील राजे प्रतिष्ठानच्यावतीनं आयोजित सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. 

श्री. केसरकर म्हणाले, आपण समाजाला काहीतरी देणं लागतो ही भावना आत्मसात करणं आवश्यक आहे. राजे प्रतिष्ठानच्यावतीनं ती भावना जपण्याच काम केलं आहे. जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर त्यासाठी घेत असलेली मेहनत कौतुकास्पद आहे असं मत अण्णा केसरकर यांनी व्यक्त केलं.

याप्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, छत्रपती उदयनराजे भोंसले यांच्या वाढदिवसानिमीत्त होत असलेला उपक्रम दखलपात्र आहे. संकट काळात समाजासाठी योगदान देणाऱ्या लोकांचा सन्मान या प्रतिष्ठाननं केला आहे. एवढंच नाही तर संकट काळात समाजाच्या मदतीला धावून जाणारी ही संघटना आहे‌. ही संघटना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा अन् विचार  खऱ्या अर्थानं हे जपत असल्याच श्री. साळगावकर म्हणाले.पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या. स्वतः संतोष तळवणेकर, संजू विर्नोडकर यांनी कोरोनात प्रचंड मेहनत घेतली होती. जंतुनाशक फवारणी, खाद्यपदार्थ वाटत, गरजुंना मदत करण्यासाठी ही संघटना पुढे होती. या संघटनेच कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं.


दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते कोरोनाकाळ, पुरग्रस्त परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना मदतीचा हात देणाऱ्यांचा 'जनसेवक' म्हणून सन्मान करण्यात आला. यामध्ये संजय गावडे,आनंद धोंड, शशिकांत गावडे, कल्याण कदम, उमेश तळवणेकर, विनायक गांवस आदींचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, सचिव रामचंद्र कुडाळकर, खजिनदार ज्ञानेश्वर पारधी, तालुकाध्यक्ष संजय गावडे, दीपक सावंत, जिवा राऊळ, सचिन गावडे, शशिकांत गावडे, उमेश तळवणेकर, संजय भिसे, सेजल पेडणेकर, अंकिता सावंत, मानसी पाटील, सरिता भिसे, अक्षता कुडतरकर, अनघा रांगणेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केशव‌ जाधव यांनी तर आभार रामचंद्र कुडाळकर यांनी मानले.