
देवगड: घरात मार्बल कपाटाचे काम करीत असताना बाेलता बाेलता अचानक जमीनीवर पडून बेशुध्द झालेल्या राजस्थान मधील कामगाराला देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तपासणीअंती त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले गुल्लाराम हिरालाल डाेगीवालाे(45) सध्या रा.जामसंडे , शिळाेम मूळ रा. जयपूर राजस्थान असे मयत कामगाराचे नाव असून ही घटना कट्टा घाडणीचे पाणी या ठिकाणी दि. 2 ऑगस्ट राेजी दुपारी 3.50 वा.सुमारास घडली.
याबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कट्टा घाडणीचे पाणी येथील रूद्रेश सखाराम बांदेलकर यांच्या घरात गुल्लाराम हिरालाल डाेगीवालाे हे मार्बलचे कपाट तयार करण्याचे काम करीत हाेते.बाेलता बाेलता अचानक खाली जमिनीवर पडून ते बेशुध्द झाले.काहीच हालचाल न झाल्याने त्यांना तात्काळ देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून ते मयत झाल्याचे सांगीतले.याबाबत माेहनलाल कानाराम सुन्डा(38) रा.जयपूर राजस्थान सध्या रा.सहकारनगर यांनी देवगड पाेलिस स्थानकात खबर दिली.पाेलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद केली असून तपास स.पाे.उपनिरिक्षक प्रवीण सावंत करीत आहेत.










