
कणकवली : प्रेमदया प्रतिष्ठान व श्री स्वामी समर्थ मठ यांच्या माध्यमातून कळसुली येथील स्वामी समर्थ मठासोमरील बांधलेली दहीहंडी राजापूरच्या गोविंदा पथकाने फोडली. ही दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके एकावर एक थर रचत होते. गोविंदा रे गोपाळा अशा गाण्यांच्या तालावर थिरकत, डिजेच्या तालावर ठेका धरत, पावसाता भिजत आणि उंदड प्रतिसादात प्रेमदया प्रतिष्ठान व श्री स्वामी समर्थ मठाचा दहीहंडी उत्सव दिमाखात साजरा करण्यात आला.
गोविंदा आला...रे आला...च्या जयघोषात थरावर थर लावून डिजेच्या तालावर नाचत मोठ्या उत्साहात कणकवली तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या कळसुली ग्रामीण भागात स्वामी समर्थ मठ येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. प्रेमदया प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष हनुमंत सावंत आणि श्री स्वामी समर्थ मठ कळसुली यांच्या माध्यमातून स्वामी समर्थ मठासमोर ६ थरांची ५५ हजार ५५५ रुपयांची दहीहंडी फोडण्याचा मान वरचीपेठ गोविंदा पथक राजापूर यांना मिळाला. गोविंद पथकांचा मनावी मनोºयांचा चित्तथरारक क्षण ग्रामस्थांनी याची देही याची डोळा अनुभवायला. विशेष म्हणजे आकर्षण ओंकार आॅडिओ आणि नृत्य आविष्कार सादर करण्यात आले.
या दहीहंडी उत्सवामध्ये श्री काळंबा गोविंदा पथक डिगस कुडाळ, जय वेतोबा गोविंदा पथक वेतोबा बांबर्डे कुडाळ, माजी पोलीस पाटील कै. वासुदेव सिताराम इंडप कोळीशी कणकवली, वरचीपेठ गोविंदा पथक राजापूर,आदीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागरी जिल्ह्यातील गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी कळसुलीत दाखल झाली होती.
उत्सवावेळी प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष हनुमंत सावंत, युवा उद्योजक सिद्धेश तळगावकर, माजी माजी तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप सावंत,सामाजिक कार्यकर्ते किरण सावंत, ओंकार दळवी,माजी ग्रामपंचायत सदस्य, किशोर घाडीगावकर, पत्रकार हेमंत वारंग, सामाजिक कार्यकर्ते पंढरी जाधव, ग्रामपंचायत सदस्या भावना तावडे, पत्रकार मयुर ठाकूर,उत्तम नगर पोलीस पाटील सुयश जंगले, कणकवली पोलीस स्टेशन कर्मचारी,आरोग्य कर्मचारी, कळसुली पंचक्रोशीसह जिल्ह्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.